सर्व महसूल विभागातील विभाग प्रमुख व संबंधित विभागातील सर्व कार्यालयीन तसेच क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, आजपर्यंत आपले विभागाकडून विविध शासन निर्णय, परिपत्रके , राजस्व अभियान , महाराजस्व अभियान अशा स्वरूपाचे विविध अभियान घेऊन क्षेत्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रशासन विषयक प्रश्न मार्गी लावणे बाबत कार्यवाही झालेली आहे. शासनाकडून अत्यंत सुस्पष्ट असे आदेश व सूचना निर्गमित केलेल्या आहेत परंतु त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर अजूनही वेगळ्या टप्प्यावर नागरिकांची कामे प्रलंबित असल्याचे लोकांच्या भेटी दरम्यान निदर्शनास आले आहे. नागरिकांची नियमाने होणारी कामे प्रलंबित न ठेवता जन-सामान्यामध्ये महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण जिल्हास्तरावर एक मोहीम हाती घेत आहोत. सदर मोहिम हि पूर्णतः ई ऑफिस द्वारे Desk to Desk आणि कालबद्धरित्या पूर्ण करावयाची असून यामध्ये कुठल्याही स्तरावर कोणी कोनाकडे (person to person) जाण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रणाली हि online रित्या ज्या त्या डेस्क मार्फत( Desk to Desk no human interfere ) होणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत प्राथमिक अवस्थेमध्ये आपण आपले Login Details तयार करावयाचे आहेत. त्याचे स्क्रीन शॉट सोबत दिलेले आहेत. त्याप्रमाणे खाली दिलेल्या वेबसाईट द्वारे आपण आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून
सुरुवातीला आपण वेब साईट ओपन केलेनंतर खालील प्रमाणे पेज दिसेल:-

आपण आपला सेवार्थ आय डी, आपले मराठीतून नाव व आडनाव , इंग्रजीमधून नाव व आडनाव ,आपली जन्मतारीख ,मोबाईल क्रमांक , आपला चालू असलेला वैयक्तिक मेल आयडी भरून आपले विभाग (department) निवडायचे आहे.

कार्यालयीन प्रकार उदा. तलाठी असेल तर सजा लेव्हल, 

कार्यालय निवडा उदा. सजा असेल तर तलाठी (सजाचे नाव ) असे drop down मधून निवडायचे आहे, त्यानंतर आपले पदनाम निवडायचे आहे.

सर्व माहिती भरलेनंतर Register या बटन वर क्लिक करा.

वरीलप्रमाणे Done असा मेसेज येईल. आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे पुढील कार्यास सुभेच्छा...
No comments:
Post a Comment