The background Property

This is some text

-->
Showing posts with label Re-Edit बाबत ठोक ताळे..... Show all posts
Showing posts with label Re-Edit बाबत ठोक ताळे..... Show all posts

Thursday, 22 February 2018

Re-Edit बाबत ठोक ताळे....

नमस्‍कार मित्रहो

सध्‍या चालु असलेल्‍या Re-Edit च्‍या अनेक अडचणी आणि त्‍यामुळे होणार मनस्‍ताप व वेळेचा अपव्‍यय यासाठी मी काही सोपस्‍कर मार्ग सुचवित आहे बघा जमले तर..

मा. जमाबंदी आयुक्‍त यांचे ०५/०५/२०१७ च्‍या परीपत्रकानुसार Re-Edit माध्‍यमातुन महत्‍वाचे मुख्‍यत: 3 पाडाव आहेत जे सविस्‍तर व Shorcut मध्‍ये करण्‍याचे उपाय समजुन घ्‍या .. 

१. खाते दुरूस्‍ती
   अ) खाते प्रोसेसींग
      I)   नावाची स्‍पेलींग दुरुस्‍ती
      II)  खाते मध्‍ये नाव समाविष्‍ट करणे
      III) खाते मधुन नाव वघळणे
      IV) खाते प्रकार दुरूस्‍त करणे
       V)  गटावरून  एखादे खाते वगळणे

   ब)  खाते विभागणी
   क)  खाते एकत्रीकरण

सर्व प्रथम odc मधील अतिरिक्त अहवाल मधील 11 नंबर चा अहवाल निरंक करा ( हा निरंक केलेने point to point खाते दिसतील म्हणजे जे 7/12 वर आहे ते 8 अ वर आहे तर जे 8 अ वर आहे तेच 7/12 वर असेल .

*  जेवढे खातामास्टर चे कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित कराल तेवढे री-एडीट ला त्रास कमी होईल . खातामास्टर व्यवस्थित तर तुमचा 7/12 व्यवस्थित हेच तत्व लक्षात ठेवावे .

आणि आता हे एकदाच आणि शेवटचे कामकाज करायचे आहे पुन्हा दुरुस्त्या आढळल्या पुन्हा युटीलिटी मागवली आणि पुन्हा तोच 7/12 वारंवार दुरुस्त करत बसण्यापेक्षा एकदाच निट करण्याचा प्रयत्न करावा .

महत्‍वाचे :  क्र १ मध्रिल खाते संबंधी अनेक ठिकाणी Error येतील जसे 

अ)  एकाच खातेतील नावांचा फरक यासाठी Edit Module मधुन नावांचा फरक दुर करा - सदर नावांचा फरक हा Edit Module मध्‍ये नावाची स्‍पेलिंग दुरूस्‍त केल्‍यामुळे पहीले
नाव व स्‍पेलिंग दुरूस्‍त केलेले नाव असे दोनही नावे एका खाते मध्‍ये दिसुन येतात यासाठी सर्व प्रथम Edit module लॉगीन करावे, मेनू मधिल दुरूस्‍ती अहवाल हया सबमेनूतील दोन ही अहवाल निवडा करुन साठवा करा. त्‍यानंतर ODC मध्‍ये जा व Village Processing करुन अहवाल ५ ची दुरूस्‍ती निवडा व ७/१२ वर असलेले परंतु खातेमास्‍टर मध्‍ये समाविष्‍ट नसलेले नावे अदयावत करा.. यानंतर पुन्‍हा Village Processing करुन अहवाल ७ बघा सदर खाते ODC च्‍या अहवाल ७ मध्‍ये दिसून येतील .. अहवाल ७ चे दुरूस्‍ती मधुन सदर खाते दुरूस्‍त करा यावेळी खाते प्रकार सामाईक निवडा व नोट करून ठेवा व दुरूस्‍ती केलेले खाते स मान्‍यता दया.. Village Processing क‍रुन Re-edit मध्‍ये खाते प्रोसेसींग करा खाते शोधा व खाते मधिल चुकिचे नाव नष्‍ट करा. खाता प्रकार वैयक्तित करा व साठवा करा आता ७/१२ बघा सदर ७/१२ वर नाव दिसत नसेल तर पुन्‍हा ODC मध्‍ये जा व दुरूस्‍ती अहवाल १५ "७/१२ वरुन नष्‍ट झालेले खाते
अदयावत करा" हे पयार्य वापरुन अदयावत करा व Village Processing करा.. लक्षात असु दया की ही प्रकिया फक्‍त वैयक्‍तीक खाते असेल तरच करा सामाईक एकुमॅ अपाक यासाठी खाते दुरूस्‍ती चा पर्याय न वापरता Re-Edit मध्‍ये नवीन खाते तयार करुन पुर्वीचे चुकीचे खाते नष्‍ट करुन नवीन खाते समाविष्‍ट करा तसेच खाते संबंधी सर्व बिनचुक माहीती जसे क्षेत्र फेरफार नं इत्‍यादी नमुद करुन साठवा करा.    

ब)  अमुक फेरफार प्रलंबीत आहे असा मेसेज मिळतो त्‍यासाठी ODBA Tools मध्‍ये "फेरफाराची माहीती अदयावत करा"  व मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला "फेरफार व्‍यवस्थित
रित्‍या प्रमाणित झाला" हया चेक ला टिक करा.

क)  अमुक खाते वर अमुक दस्‍त क्रं प्रलंबीत आहे असा मेसेज मिळतो - अशावेळी खाते संबंधी दुरूस्‍ती करु नये कारण सदर खातेवर हस्‍तांतरण झालेले आहे व हस्‍तांतरणाची
कार्यवाही पुर्ण झालेली नसल्‍यामुळे अशा खाते च्‍या ७/१२ दुरूस्‍त्‍या हस्‍तांतरणाचे प्रक्रिया पुर्ण झाल्‍यावर स्‍वतंत्र फेरफार ने दुरूस्‍त करता येतील. सदर खातेची आता Re-Edit मध्‍ये दुरूस्‍ती
केल्‍यास नंतर फेरफाराची कार्यवाही करतांना पुन्‍हा error ला सामोरे जावे लागेल त्‍यामुळे सध्‍या दुरूस्‍ती न करणे योग्‍य असेल.

ड) "सदर सर्वे नं वर समान नावची दोन खाते आहेत वगैरे वगैरे ..." अशावेळी निश्चित सदर सर्वे वर दोन नावे असतात पैकी एक ODU कंस करुन केलेली दुरूस्‍तीमुळे असे खाते निर्माण झालेली असतात - अशावेळी सदर सर्वे क्रं नोट करा व खाते ची दुरुस्‍ती न करता सदर गट Declaration-1 नंतर Re-Edit मध्‍ये निवडा व भोगवटदाराची माहीती मध्‍ये कंस झालेले खाते निवडा व मेनू बटनापैकी "निवडक गट क्रं वरुन खाते काढणे" हया पर्यायाचे माध्‍यमातुन कंस केलेले खाते नष्‍ट करुन व अचुक खाते ची सर्व बिनचुक माहीती जसे क्षेत्र फेरफार नं इत्‍यादी नमुद करुन साठवा करुन खाते ची दुरूस्‍ती करता येईल.

इ) खाते दुरूस्‍तीच्‍या माध्‍यमातुन खाते एकत्रीकरण केल्‍यास जे खाते एकत्र केले त्‍या गटावरुन नावे निघून जातात  - यासाठी खाते दुरूस्‍तीच्‍या माध्‍यमातुन खाते एकत्र न करता असे खाते नोट करा व सदर खाते ज्‍या गटावर योग्‍य असेल ते खाते नं नोट करुन योग्‍य व अचूक खाते असलेले गट सोडून इतर गट Declaration-1 नंतर Re-Edit मध्‍ये निवडा व भोगवटदाराची माहीती मध्‍ये सदर चुकीचे किंवा एकत्र करावयाचे दुसरे खाते खाते निवडा व मेनू बटनापैकी "निवडक गट क्रं वरुन खाते काढणे" हया पर्यायाचे माध्‍यमातुन सदर चुक असलेले किंवा एकत्र करावयाचे अन्‍य दुसरे खाते नष्‍ट करा व अचुक खाते ज्‍या खात्‍यात अन्‍य खाते एकत्र करावयाचे आहे ते खाते "खाते समाविष्‍ट करणे" हया मेनु बटनाच्‍या माध्‍यमातुन खाते नं नमूद करुन खाते शोधा व समाविष्‍ट करा तसेच खाते संबंधी सर्व बिनचुक माहीती जसे क्षेत्र फेरफार नं इत्‍यादी नमुद करुन साठवा करा. अशाप्रकारे खाते दुरूस्‍ती करता येते आणि error चा सामना करावा लागणार नाही तसेच वेळ वाचेल व दुरूस्‍ती योग्‍य होतात.
 
अतीमहत्‍वाचे ; खाते दुरूस्‍ती करीता ODU प्रणालीचा वापर करुन कृपया दुरूस्‍ती करु नका कारण इथे स्‍वंतत्र फेरफार घेतल्‍याचे नमुद दिसेल आणि तो चुकीच्‍या पदधतिने असेल जे उदया अडणीचे होईल फेरफार क्रमांकाचे दुबार नोंदी तयार होतील (हस्‍तलिखीत व संगणकीकृत ODU च्‍या) अशा नोंदीमुळे प्रशासकीय एैवजी भा. दं. वि. कलम ४२० नुसार फौजदारी स्‍वरुपाचा गुन्‍हा ठरु शकतो त्‍यामुळे ज्‍या हस्‍तलिखीत नोंदी संगणकीकृत ७/१२ वर अम्‍मल घेण्‍याचे राहून गेल्‍या असतील अशाच नोंदी ODU च्‍या माध्‍यमातुन घेणे उचीत राहील.
 

***** ई फेरफार मधुन बल्‍क साईन पुर्ण करा त्‍यासाठी जेव्‍हा तलाठी लॉगीन ला बल्‍क साईन करता त्‍याच वेळी मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला पण बल्‍क साईन सुरू ठेवा साधारणत: एका गावासाठी 3 ते 6 तास वेळ लागेल परंतु बल्‍क साईन पुर्ण झालेवरच  Re-Edit ला सुरूवात करा *******

महत्‍वाचे : 
                      १)   अहवाल २६ "भोगवटदार वर्ग २ आहे परंतु - १क मध्‍ये नाही" सदर अहवाल निरंक करणे करीता ई फेरफार मधिल मेनू मध्‍ये नियंत्रीत सत्‍ता प्रकाराची नोंद या पर्यायातुन सदर गट निवडा करुन आदेश क्रं व दिनांक नमुद करुन साठवा करा व सदर नोंद ला मंडळ अधिकारी यांची मान्‍यता घ्‍या अहवाल निरंक होईल. तसेच अहवाल २५ "भोगवटदार वर्ग १ आहे परंतु - १क मध्‍ये समाविष्‍ट आहे"  असे गट ई फेरफार च्‍या अहवाल सदरी 1क च्‍या जमीनींची यादी मध्‍ये दिसतील ते सर्व गट आपल्‍या तालुका DBA यांचे ई फेरफार लॉगीन मध्‍ये 1क चे व्‍यवस्‍थापन हया पर्यायातून भोगवटदार वर्ग 1 चे गट बाहेर काढा. 
२) अहवाल १ ची प्रिंट काढा 

3) अहवाल : शून्य क्षेत्राची खातेदार ची प्रिंट काढा .( वरील 3 हि अहवाल मार्गदर्शक म्हणून काम करतील ) 

यानंतर आता तुमचा प्रिंट झालेला व तपासलेला 7/12 समोर ठेवा व प्रतेक प्रिंट वर अगदी बारकाईने पाहत दुरुस्त्या सुरु करा .



२.  ७/१२ दुरुस्‍ती (पुर्वी Edit मध्‍ये ज्‍या प्रमाणे दुरूस्‍त्‍या केल्‍या त्‍याप्रमाणेच Re-Edit मध्‍येही करता येतात व दुरूस्‍त्‍या केल्‍यानंतर साठवा करुन परीशिष्‍ट ब तयार करुन तहसीलदार यांचे परीशिष्‍ट ब चे आदेशानुसार फेरफार क्रमांक देवुन मंडळ अधिकारी यांचे कडून मान्‍यता घ्‍यायची आहे तसेच या मध्‍ये क्रं 1 मध्‍ये नमुद महत्‍वाचे क अणि ड च्‍या योग्‍या त्‍या दुरुस्‍त्‍या करावयाच्‍या आहेत)

सर्व दुरुस्त्या व्यवस्थित केल्यास कुठलाही अहवाल येत नाही व दुरुस्त्या मधेच सर्व अहवाल निरंक व्हावेत त्याचप्रमाणे दुरुस्त्या करावेत .

(यानंतर पुन्‍हा ODC अहवाल १ ते २८ निरंक करा Village Processing करा व Re-Edit च्‍या माध्‍यमातुन दुरुस्‍त्‍या केलेल्‍या सर्व गटांचे प्रिन्‍ट काढा तसेच मुळ अभिलेखा वरुन तपासणी करुन चुका योग्‍य प्रकारे दुरूस्‍त झाले किंवा कसे हे पहा यानंतर चुका योग्‍य प्रकारे दुरूस्‍त झालेची खात्री झालेनंतर घोषणपत्र-०२ दया) परंतु
महत्‍वाचे :  घोषणापत्र-२ देण्‍याआगोदर सर्व दुरूस्‍त्‍या पुन्‍हा एकदा तपासून घ्‍या तसेच ODU मधिल अम्‍मल घेण्‍याचे राहीलेले फेरफार चा अम्‍मल घ्‍या कारण घोषणापत्र-०२ दिल्‍यानंतर ODU आपल्‍यासाठी आपोआप बंद होईल व पुन्‍हा ODU वापरता येणार नाही त्‍यामुळे ODU च्‍या प्रलंबीत नोंदी पुर्ण करुनच किंवा प्रलंबीत नसतील तर आता घोषणापत्र-०२ दया. 


(वरील प्रमाणे महत्‍वाचे व अतीमहत्‍वाचे समजुन अशापध्‍दतीने सर्व दुरुस्‍ती झाले असेल तर इथे पुन्‍हा ODC चे अहवाल १ ते २८ निरंक करुन Village Processing करा तसेच पालक अधिकारी यांची तपासणी ठरवून दिलेल्‍या पालक अधिकारी यांचे कडून १ ते २४ मुदयात तपासणी करुन तपासणी चेकलिष्‍ट भरा आणि निशिंत राहून घोषणपत्र-०२ दया)

***** ई फेरफार मधुन पुन्‍हा बल्‍क साईन पुर्ण करा त्‍यासाठी जेव्‍हा तलाठी लॉगीन ला बल्‍क साईन करता त्‍याच वेळी मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला पण बल्‍क साईन सुरू ठेवा साधारणत: एका गावासाठी २ ते 3 तास वेळ लागेल परंतु बल्‍क साईन पुर्ण झालेवरच घोषणापत्र ३ ची कार्यवाहीला सुरूवात करा *******

#### ODC मधून खाता क्रमांक योग्‍य क्रमाणे लावणे हया पर्यायातुन खाते क्रमांक योग्‍य क्रमात लावा तसेच दुरूस्‍ती मान्‍यता देवून साठवा करा व Village Processing करा. ( बंधनकारक नाही )

३.  समरी रिपोर्ट :  ODC प्रणालीत अहवाल सदरी "समरी रिपोर्ट १ ते २८ तपासणी करा व राहीलेले अहवाल योग्‍य प्रकारे निरंक करा.




उपरोक्‍त प्रमाणे महत्‍वाचे व अतीमहत्‍वाचे तसेच करावयाची कार्यवाही हे सर्व पुर्ण झाले असेल तसेच समरी रिपोर्ट १ ते २८ निरंक असेल तर घोषणपत्र-०३ बाबत माहीती भरुन घोषणपत्र-०३ दया.

डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...