Declaration 1 हे तलाठी यांनी एकटे न देता MCI, मंडळ अधिकारी आणि DBA आणि आपापल्या तालुक्यातील तज्ञ तलाठी यांच्या उपस्थित तहसील कार्यालयातच खालील बाबींची तपासणी करून करावे.
1) सर्व खातेदारांना आडनाव टाकले आहे काय?
2) गरज असलेल्या सर्व खात्यांची खाता विभागणी/खाता एकत्रीकरण केले आहे काय?
3) एकाच नावाचे एकच खाते आहे की थोड्या फार फरकाने जसे र्हस्व दीर्घ प्रमाणे वेगवेगळी झाली तर नाहीत ना?
4) जर एकाच व्यक्तीच्या नावाने व्यक्तिगत खाते आणि सामाईक खाते असेल तर सामाईक खात्यातील त्याचे नाव व्यक्तिगत खात्यातील नावाप्रमाणे पाहिजे. नाहीतर तो व्यक्ती मयत झाल्यास वारस फेरफारचा अंमल फक्त व्यक्तिगत खात्यावर होईल.
5) खात्यातील पि, भ्र, सौ, हे सर्व उपसर्ग काढले आहेत काय?
6) गरज नसलेली खाते नष्ट केली आहेत काय?
7) सर्व खात्यांचा खाते प्रकार बरोबर आहे काय?
8) सज्ञान व्यक्तीचे अ. पा. क. शेरा कमी केला आहे काय? तसे करणे खाता दुरुस्ती मोडूल मधून खूप सोपे आहे ( यासाठी फेरफार ची आवश्यकता नाही)
9) ए कु मॅ , एकत्र कुटंब कर्ता असे खाते नाहीत ना?
वरील प्रमाणे दुरुस्त्या केल्या असतील आणि आता काही दुरुस्त्या करणे शिल्लक नसतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्या समोर excel sheet मध्ये माहिती घेऊन योग्य ती पद्धत वापरून तापासणी करून त्यांची खात्री झाली तरच declaration 1 करा.