The background Property

This is some text

-->

Tuesday, 4 August 2020

डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध

राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे फेरफार नोंदवही व गाव नमुना 8 अ म्हणजे खाते उतारा ची संगणकीकरण राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फत पूर्ण झालेले आहे.
 हे संगणकीकृत अभिलेख जनतेला ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने महाभूमी पोर्टल विकसित केलेले असून या पोर्टलवर सध्या डिजिटल स्वाक्षरी करत गाव नमुना नंबर सातबारा उतारा उपलब्ध करून दिले जात आहेत या वर्षीच्या महसूल दिना निमित्त दिनांक 01/08/2020 पासून डिजिटल स्वाक्षरी करत गाव नमुना 8 अ म्हणजे खाते उतारा ची आणखीन एक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे .

डिजिटल स्वाक्षरी करत खाते उतारा यांची वैशिष्ट्ये
1) महाभूमी पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरी सातबारा दोन्ही एकत्र उपलब्ध झालेला आहे.

2) हे डिजिटल स्वाक्षरीकृत खाते उतारे व सातबारा उतारे सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी वैद्य समजण्यात येतील.

 हे उतारे डिजिटल स्वाक्षरी करत असल्याने त्यावर पुन्हा तलाठी किंवा आणि महसूल अधिकारी यांच्यासह याची आवश्यकता भासणार नाही.

3) डिजिटल स्वाक्षरी करून डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना सातबारा व आठ अ वर दर्शवलेल्या QR कोड व सोळंकी पडताळणी क्रमांकाचे आधारित याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे.

4) हे खाते उतारे अथवा सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्यासाठी ऑनलाइन शुल्क भरून आपण सदर उतारे डाउनलोड करु शकतात .

महसूल विभागाच्या वतीने जमाबंदी  कार्यालयाच्या नियंत्रणाखाली सर्व भूमी अभिलेखांचे संगणकीकरण *ई-महाभूमी* नावाने सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत केले जात असून त्यामध्ये  ई-फेरफार कार्यक्रमाचा समावेश आहे.

* सदरची ई-फेरफार प्रणाली एन आय सी पुणे यांनी विकसित केली असून त्याअंतर्गत राज्यातील सर्व सातबारा उतारे तलाठी व मंडलाधिकारी यांचे अहोरात्र केलेल्या परिश्रमाने  संगणकीकरण करण्यात आलेले असून त्यापैकी 99 टक्के सातबारा डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेले आहेत.

Https://www.talathikandalgaon.com
https://www.vipinum.in

Saturday, 1 August 2020

गाव नमुने 1ते 21

आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत सानप यांनी गाव नमुने 1 ते 21 तयार केले आहेत. सर्व तलाठी यांनी सदर गाव नमुने खालिल लिंक वरून डाउनलोड  करावे.


गाव नमुने 1 ते 21

आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत सानप यांनी गाव नमुने 1 ते 21 तयार केले आहेत. सर्व तलाठी यांनी सदर गाव नमुने खालिल लिंक वरून डाउनलोड  करावे.


Friday, 24 July 2020

कोल्हापुर - महाजास्व अभियान



सर्व महसूल विभागातील विभाग प्रमुख व संबंधित विभागातील सर्व कार्यालयीन तसेच क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, आजपर्यंत  आपले विभागाकडून विविध शासन निर्णय, परिपत्रके , राजस्व अभियान , महाराजस्व अभियान अशा स्वरूपाचे विविध अभियान घेऊन  क्षेत्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रशासन विषयक प्रश्न मार्गी लावणे बाबत कार्यवाही झालेली आहे. शासनाकडून अत्यंत सुस्पष्ट असे आदेश व सूचना निर्गमित केलेल्या आहेत परंतु त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर अजूनही वेगळ्या टप्प्यावर नागरिकांची कामे प्रलंबित असल्याचे लोकांच्या भेटी दरम्यान निदर्शनास आले आहे. नागरिकांची नियमाने होणारी कामे प्रलंबित न ठेवता  जन-सामान्यामध्ये महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण जिल्हास्तरावर एक मोहीम हाती घेत आहोत. सदर मोहिम हि पूर्णतः ई ऑफिस द्वारे Desk to Desk  आणि कालबद्धरित्या पूर्ण करावयाची असून यामध्ये कुठल्याही स्तरावर कोणी कोनाकडे (person to person) जाण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रणाली हि online रित्या ज्या त्या डेस्क मार्फत( Desk to Desk no human interfere ) होणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत प्राथमिक अवस्थेमध्ये आपण आपले Login Details  तयार करावयाचे आहेत. त्याचे स्क्रीन शॉट सोबत दिलेले आहेत. त्याप्रमाणे खाली दिलेल्या वेबसाईट द्वारे आपण आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून 
सुरुवातीला आपण वेब साईट ओपन केलेनंतर खालील प्रमाणे पेज दिसेल:-


आपण आपला सेवार्थ आय डी, आपले मराठीतून नाव व आडनाव , इंग्रजीमधून नाव व आडनाव ,आपली जन्मतारीख ,मोबाईल क्रमांक , आपला चालू असलेला वैयक्तिक मेल आयडी भरून आपले विभाग (department)  निवडायचे आहे.
कार्यालयीन प्रकार उदा. तलाठी असेल तर सजा लेव्हल,

कार्यालय निवडा उदा. सजा असेल तर तलाठी (सजाचे नाव ) असे drop down मधून निवडायचे आहे, त्यानंतर आपले पदनाम निवडायचे आहे.
सर्व माहिती भरलेनंतर Register या बटन वर क्लिक करा.
वरीलप्रमाणे Done असा मेसेज येईल. आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे पुढील कार्यास सुभेच्छा...

Monday, 13 April 2020

राष्ट्रीय भूमापन दिन



MONDAY, APRIL 13, 2020

राष्ट्रीय भूमापन दिन 


राष्ट्रीय भूमापन दिन
भारतातील जमिनींची मोजणी १० एप्रिल १८०२ रोजी  सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?

त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.

जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.

राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.

मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्याच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी, प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.

जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.१५४० ते १५४५ दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.

मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळीचा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी १/३ हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील १९ वर्षाच्या सरासरी इतके पुढील १० वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे. मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन १६०५ ते १७२६ या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.

मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन १६७४ पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला “कमालधारा” म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.

दुसर्‍या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला. १८ व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा, अजंठा टेकड्या , महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याचदरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे.

ब्रिटीशांनी सन १६००-१७५७ पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन १७६७ मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ‘”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.

सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. १८३० मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी ३३ वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण ३७ वर्षात पूर्ण झाले.

सन १८१८ मध्ये जेव्हा ब्रिटीशानी मराठयाकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एन्डफिंस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी ३३ फुट लांबीची असून १६ भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला. ४० गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत.

जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन १८२७ मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.

सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त ई-मोजणी, ई-फेरफार, ई- चावडी, ई- अभिलेख,  ई-अभिलेख, ई-नकाशा, ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई- भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.

Wednesday, 24 April 2019

GCC-ESDS-CLOUD वर DILRMP data स्थानांतरित जिल्ह्यांना लॉगिन पद्धती

ज्या जिल्ह्यांचा ई फेरफार चा Data NDC/SDC/BSNL Cloud वरून GCC-ESDS-CLOUD सर्व्हर वर मायग्रेट करणेत आला असून त्यामुळे आपल्याला आता ई फेरफार मध्ये लोगिन करण्यासाठी cisco VPN/Forticlint ची गरज भासणार नाही, मात्र आपले लॉगीन प्रक्रिया बदलली आहे, त्यामध्ये प्रथम इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये https://mahaferfar.enlightcloud.com या वेबसाईट ला सर्च करावयाचे आहे त्यानंतर आपणास *user ID* म्हणजे आपला मेल आय डी म्हणजे EX. ckamraj@gmail.com टाकायचा आहे व *पासवर्ड* (तालुक्यातील DBA यांचे कडे पाठविले असेल)म्हणजे wSyMhpMAAYaTr9xZ हा टाकून sign in या  button वर क्लिक करायचे आहे . त्यानंतर आपल्या *रजिस्टर मोबाईल क्रमांक वर एक OTP येणार* आहे तो OTP टाका.त्यानंतर त्यानंतर आपण आपला *पासवर्ड बदलायचा* आहे , पासवर्ड हा *16 अंकी* असावा त्यामध्ये एक अप्पर केस म्हणजे व एक लोअर केस एक नुमरिक असे एकूण कमीकमी 16 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. उदा. Kamrajcccc_00000. पासवर्ड बदल्लेनंतर password change successfully असा मेसेज येईल.त्याच मेसेज च्या खाली go back असा option असेल त्यावर क्लिक करा.
https://mahaferfar.enlightcloud.com/eferfarmenu/ या बटन वर क्लिक केले नंतर आपल्याला आपले पूर्वीचे DILRMP चे first  पेज (dash board )दिसत होते तसे दिसेल त्यामध्ये ई फेरफार वर क्लिक करून पूर्वीप्रमाणे आपल्या सेवार्थ ने व dsc ने लॉगीन करायचे आहे. 
  वरील नवीन तयार केलेला पासवर्ड ने आपला मेल आय डी म्हणजे आपला user आय डी  व पासवर्ड हा आपण नवीन तयार केलेला नि  sign in वर क्लिक करायचे असून त्यानंतर आपल्या मोबाईल वर येणाऱ्या OTP टाकून sign in वर क्लिक करायचे आहे.
*हा प्रातिनिधिक आय डी पासवर्ड असून वरील  प्रमाणे आपले मेल आय डी वर येईल त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करावी*
धन्यवाद !

कामराज ब चौधरी
तलाठी पुसद जी यवतमाळ

Sunday, 27 January 2019

संगणकीकरण बाबत सुचना

[23/01, 9:33 am] Vipin: केलेले कामकाज दिसेलच ते कोठेही
जाणार नाही,

अहवाल 1 ची प्रिंट काढावी यामधील खरोखर क्षेत्र न जुळणारे 7।12
बाबत पुढील  कार्यवाही(155 अथवा इतर अडचणीकृत
आदेश) करत राहावी.

जर काही प्रॉब्लेम आहे म्हणून ती दुरुस्त करता येत नाहीय - त्याबाबत
डेव्हलपमेंट आवश्यक आहे असे वाटत असेल तर
कुठल्याही परिस्थितीत ऍडजस्टमेंट करून पुन्हा पश्चताप करत बसू
नये(काम एकदाच पण नीट करायचे आहे).
शेवट एकच पुन्हा या 7।12 मध्ये दुरुस्ती राहावी व पुन्हा हेच काम
करण्यास भाग पडावे याचा विचार काढून टाकावा
आणि एकदाच जे की या नंतर कधीही कामकाज करण्याची गरज
लागणार नाही असे कामकाज करत राहावे.
..... विपीन उगलमुगले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



[24/01, 2:31 am] Vipin: *सर्व मंडळअधिकारी यांचेसाठी*

- तलाठी एखाद्या गटामध्ये काही दुरुस्ती असलेस reedit चा वापर
करून त्यामध्ये दुरुस्ती करत आहेत किंवा तसे त्यांनी
करणे क्रमप्राप्त आहे . ज्यावेळी त्या दुरुस्तीकृत गटांचे परिशिष्ट तयार
करून त्याचा फेरफार तयार केला जातो त्यानंतर
मंडळ अधिकारी याना सदर फेरफार दिसतो. *अशावेळी
मंडळअधिकारी यांचे dashboard ला सदर गट मंजुरी करीता
दिसतात , तद्नंतर त्याचे पूर्वावलोकन पाहून बरोबर असेल तर मंजूर
अथवा चुकीचे असेल तर तो गट नामंजूर करणे असा
फ्लो आहे मात्र त्या मंजुरीच्या रस्त्यावर जातेवेळी पूर्वावलोकन बटन
वर क्लिक करूनच पुढे जावे लागते म्हणून ते बटन प्रेस
करायचे आणि तत्काळ सदर विंडो क्लोज करायची असा मार्ग काही
मंडळअधिकारी स्वीकारताना दिसत आहेत* मात्र सदर
बाब पूर्णत: चुकीची असून त्यामुळे काही अडचणीमुळे अंमल चुकीचा
होत असल्यास त्याबाबत मंडळअधिकारी यांचे कडून
पण चुकीचा गट मंजूर होतो आणि तो कायम होतो आणि मग
खातेदाराच्या हातामध्ये 7/12 पडल्यावर लक्षात येते किंवा
पुन्हा चेक केलेवर लक्षात येते कि अंमलच झाला नाही.....त्यानंतर
पुढे काहीच पर्याय राहत नाही कारण आता सद्यस्थिती
मध्ये *reedit पूर्ण झालेनंतर दुरुस्तीचे सर्व दरवाजे बंद करणेत
आलेले आहेत* पर्यायी मा.तहसीलदार सो यांचा १५५ आदेश
घेणे हा एकमेव पर्याय राहतो( विनाकारण एका चुकीमुळे प्रशासनाला
जास्तीचे काम लागू शकते) . आणि हे सगळे फक्त
आपल्या पूर्वावलोकन व्यवस्थित न पाहता पुढे जाण्याच्या
मार्गामुळे......... त्यामुळे reedit असो वा ई फेरफार असो
पूर्वावलोकन व्यवस्थित दाखवत नसेल तर पुढे जाऊ नका (थोडा
अधिक वेळ लागेल हरकत नाही) त्याच ठिकाणी reentry
अगर रद्द चा पर्याय वापरा जेणेकरून संबंधितांना त्याबाबत योग्य ती
दुरुस्ती करता येईल.......



[24/01, 11:30 pm] Vipin: सर्व dba यांचेसाठी


आपण नायब तहसीलदार या पदाबरोबरच तालुक्याचे डेटा बेस
अडमिनिस्ट्रेटर म्हणून महत्वाचे कामकाज पाहत आहात .

म्हणजे अपलेकडे तालुक्यातील सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी तसेच
म्युटेशन सेल कर्मचारी यांचेवर संगणकीकृत च्या दृष्टीने
सर्व तोपरी नियंत्रण आहे.

आपण dba आहेत म्हणजे आपल्याला एक स्वतःचा आय डी व
पासवर्ड आहे त्याद्वारेच आपण सिस्टीम मध्ये प्रवेश करत
आहात व त्याच आय डी ने आपण जे तालुक्यासाठी जे बदल करावयाचे
आहेत ते करत असता .

उदा. 1) तलाठी ,मंडळ अधिकारी तसेच म्युटेशन सेल कर्मचारी यांचे
रजिस्ट्रेशन, ट्रान्सफर किंवा पदोन्नती अथवा डी
रजिस्ट्रेशन.

2) तालुक्यातील 8अ वर जिल्हा परिषद दर आपणच ठरवता .

3) तालुक्यातील यूजर कडून मल्टिपल लॉगिन झालेने ब्लॉक झालेले
गाव आपण रिलीज करता.(गाव ब्लॉक झालेनंतर
असे का झाले असा प्रश्न आपणास पडणे क्रमप्राप्त आहे )

4) यूजर कडून 1 क मधील गट रिमूव्ह ची रिक्वेस्ट आपणच अप्रुव्ह
करता.


5) अतिरिक्त लागवड अयोग्य पिकांची नोंद तालुक्यासाठी आपणच
ऍड करता.

6)  तालुक्यामध्ये नको असलेली अथवा आणखी आवश्यक असलेल्या
पिके बाबत कमी जास्ती आपणच करता.

7) अत्यन्त महत्वाचे यूजर ची डिजिटल सिग्नेचर ची नोंद आपणच
घेता.(अत्यन्त महत्वाचा मुद्दा- आपल्या तालुक्यात एकूण
यूजर किती व कोण आणि सिस्टीम मध्ये किती व कोण याबाबत
आपण आढावा घेणे क्रमप्राप्त आहे )म्हणजे एखादा
कर्मचारी रिटायर होतो मात्र आपल्या तालुक्यात इनसर्विस असतो,
एखाद्याचे पद बदलले जाते मात्र आपल्या तालुक्यात तो
मूळच्याच पदावर असतो.

8) reedit मधील खातामास्टर बाबत 1st डिक्लेरेशन रिकॉल ला
मान्यता आपणच देता.

9) तालुक्यातील एखाद्या गावाचा अहवाल व्यवस्थित जनरेट होत
नसेल अथवा टेबल मध्ये काही अडचण असेल तर बटन
रिफ्रेश / टेबल सुस्थितीत करणे हे आपल्याच लॉगिन ने केले जाते .


10) reedit मधील डिक्लेरेशन 2 हे आपलेच स्वहस्ते केले जाते .

आणखी भरपूर कामकाज आपले लॉगिन ने होते ,आपण सर्वजण
dilrmp प्रोजेक्ट मध्ये अत्यन्त महत्वाचे काम करत आहात.
मात्र आपण जेवढे महत्वाचे कामकाज करत आहात तेवढच महत्वाचं
आपला लॉगिन आय डी पासवर्ड आहे कृपया तो
कोणाला शेअर करू नका.

वरील उदाहरणांपैकी तसेच इतरही सर्व कामकाज  आपणास ज्ञात
आहेच व हे सर्व करत असताना आपले जेवढे कामकाज
गतीने असेल तेवढे तलाठी लोकांना कामकाज करणेस सोपे व गतीने
जाते  , पुन्हा एकदा , reedit हे मॉड्युल 7।12
दुरुस्तीबाबत अंतिम मॉड्युल असून त्याबाबत सर्वांनी सावधानतेणे
कामकाज पहावे, काही अडचणी असतील तर शेअर
करत राहा , तुम्हाला त्याबाबत सोल्युशन माहीत असेल तर तेही शेअर
करत राहा व शक्य होईल तेवढ्या गतीने मात्र अचूक
जे की पुन्हा पुन्हा तेच करण्याची गरज लागू नये असे reedit चे
कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणेचे गरजेचे असताना काही
ठिकाणी आणखीही ना दुरुस्त 7/12 राहिलेले आहेत त्यामुळे 155
ची प्रक्रिया करून घ्यावी जेणेकरून ई चावडी कडे वाटचाल
व्यवस्थित करता येईल .

डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...