The background Property

This is some text

-->

Thursday, 11 October 2018

1 लाखाच्या आतील बोजा नोंद न करणेबाबत

१ लाखाच्या आतील बोजा नोंद न करणेबाबत पत्र पहानेसाठी येथे क्लिक करा




                                                        स.बा.नं.     / 2018
                                                     मंडळअधिकारी कार्यालय,______
                                                                                                                         दि.      /     /2018.

प्रती ,
सचिव / चेअरमन
``````````````````````````````````````````````
              विषय :  1 लाखापेक्षा कमी ची नोंद 7/12 पत्रकी न करणे बाबत
              संदर्भ : क्र. कार्या.8 आर टी एस /आर आर/923/2017, जिल्हाधिकारी कार्यालय                                      कोल्हापूर दि. 02/05/2017 चे परीपत्रक

              उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपल्या संस्थेला कळवणेत येते कि भारतीय रिजर्व्ह बँकेचा दि.11/05/2012 रोजी च्या सह्पत्रातील परीच्चेद 12(12.2)(iii) अन्वये कृषी कर्ज बाबतच्या सुधारित योजनेनुसार र.रु.1 लाख पर्यंत च्या कर्जासाठी जमिनीची(तारण) आवश्यकता  नाही.परंतु त्यानंतरही आपलेकडून तलाठी कार्यालय कडे असे पत्र प्राप्त होत आहे.त्यामुळे शेतकरी यांना विनाकारण त्रास सोसावा लागत असून प्रशासनावर देखील कामकाजाचा अनावश्यक ताण निर्माण होत आहे .
       तरी यापुढे 1 लाख पर्यंतच्या नोंदी 7/12 सादरी नोंद करणे कामी देनेत येऊ नयेत.तसेच 1 लाख च्या वरील ई करार / बोजा नोंद करावयाच्या असलेस संबंधित  शेतकरी अथवा खातेदार यांना बँक खाते नंबर सह किती रक्कम मंजूर केली त्याचा तपशीलसह बँक अधिकारी यांच्या स्वाक्षरी ने नोंदी साठी पत्र देनेत यावेत.
सदर पत्र देतेवेळी आपल्या कार्यालयाचा जावक क्रमांक सह च पत्र देनेत यावे.

                                                               मंडळअधिकारी,_____
       प्रत – माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी_
1] तलाठी.............. वरील परिपत्रकाचा अंमल बजावणी  काटेकोर पणे करणेत यावी व र.रु. 1 लाख च्या वरील बोजाची नोंद बँक निरीक्षक यांचे मंजूर पत्राशिवाय घेनेत येऊ नये.तसेच विना-जावक क्रमांकाची पत्र स्वीकारू नयेत.
2] मा. तहसीलदार सो.पन्हाळा
3] मा. जिल्हाधिकारी सो. कोल्हापूर


Saturday, 30 June 2018

***************************DSP बाबत काही महत्वाच्या सूचना ****************************


आपण सध्या अहोरात्र DSP काम करत आहात , त्याबाबत काही महत्वाच्या सूचना द्यावयाच्या आहेत 
.
) घोषणापत्र करताना आपण आपल्या गावाची दिनक १६.१०.२०१७ रोजी च्या परिपत्रकाप्रमाणे परिपूर्ण संचिका तालुका अभिलेख कक्षात जमा केली असेन .
) अशी संचिका प्रत्यक्ष सर्व प्रमाणपत्र , प्रपत्र दुरुस्त केलेले /१२ . सह असल्याची खात्री तहसीलदार यांनी करावी . तहसीलदार यांनी सर्व गावांची अशी संचिक जमा झाल्याची खात्री करूनच प्रख्यापानाचा आदेश काढणे आपेक्षित आहे .
) प्रख्यापण आदेशानंतर तलाठी यांनी DSP चे काम सुरु करण्यापूर्वी सर्व ODC अहवाल निरंक केले असल्याची खात्री करावी .
) कदाचित काही अहवाल घोषणापत्र करताना आपण निरंक केले असतील तरीही आत्ता दिसत असलेले सर्व अहवाल निरंक करणे आवश्यक आहे .
 ) ODC मध्ये काही नवीन हवाल जसे कि अतिरिक्त अहवाल ११ , अतिरिक्त अहवाल हे अहवाल ते निरंक करण्यासठी च्या सुविधा काहीश्या उशिरा मिळाल्या असल्यातरी ते सर्व अहवाल DSP चे काम सुरु करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे .
) डिजिटल स्वाक्षरीत केला जाणारा प्रत्येक /१२ आपण स्वतः ( तलाठी ) योग्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक /१२ कन्फर्म करण्यापूर्वी स्वयघोषणा तलाठ्याने करणे आवश्यक आहे .
) DSP करण्यासाठी आता /१२ PDF करण्याची गरज नाही अशी सुधारणा काही दिवसापूर्वी केली असल्याने आता /१२ डिजिटल स्वाक्षरीत करताना दोनच टप्पे आहेत.
) एकाही अचूक नसलेला /१२ तलाठी यांनी डिजिटल स्वाक्षरीत करू नये कारण त्याची उपलब्धता ONLINE पद्धतीने होणार असलेले तो कोणत्याही शासकीय कायदेशीर कामांना वापरला जाऊ शकतो.
 ) /१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी सर्व शेती चे /१२ मध्ये मागील तीन वर्षाची पिक पाहणी केलेली असावी. बिनशेती क्षेत्र असलेल्या /१२ वर पिक पाहणी भरणे आवश्यक नाही.
१०) अहवाल निरंक करण्यासाठी तहसीलदार यांचे कडून कलम १५५ चे अथवा उप विभागीय अधिकारी यांचे करून कलम २५७ प्रमाणे आदेश प्राप्त करून घेऊनच दुरुस्त्या करणेत याव्यात.
११) अहवाल निरंक करताना आपल्या गावचा मुळ आकारबंद पाहूनच गाव नमुना नं. मधील सर्वे निहाय क्षेत्र हे. आर मध्ये नमूद करावे. अकृषक अथवा कृषक /१२ सुद्धा अहवाल आपण क्षेत्र आर चो मी मध्ये रुपांतरीत करूनच दाखवला आहे. बिगरशेती प्लॉट पडले असले तरी त्याचे आकारबंद मधील खेत्र हे आर मधेच नमूद करावे .
१२) अहवाल निरंक करण्यासाठी आकारबंदातील क्षेत्र चुकीचे भरून अहवाल निरंक करू नये . प्रत्यक्ष आकारबंद पाहूनच क्षेत्र भरावे.
१३) फेरफार मध्ये दिलेला खातेदारांच्या संखेच्या अहवाल प्रमाणे खाते विभागणी आवश्यक असल्यास ODC मधील दुरुस्ती सुविधा खाते क्रमंक बदलने मधून करावी .
१४) ज्या तालुक्यांचे अद्याप घोषणापत्र चे काम पूर्ण झाले नाही त्यांनी ODC निरंक करूनच अंतिम प्रमाणपत्र द्यावे .
१५) आगोदर आपण फक्त ONE TIME DSP करत होतो , आत्ता गाव नमुना . मध्ये कोणताही बदल फेरफार मंजुरीनेच होणार आस फेरफार मंजूर झाले नंतर ज्या /१२ वर त्याचा परिणाम होणार आहे ते सर्व /१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी DSP मध्ये फेरफार पश्च्यात डिजिटल स्वाक्षरी साठी ( DSP AFTER MUTATION ) उपलब्ध होणार तो सातबारा DSP केलेला जुन्या /१२ च्या जागी रिप्लेस होणार असी सुविध निर्माण करून काही जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली आहे लवकरच सर्व जिल्ह्यांना ती मिळेल .
१६) ज्या ठिकाणी १५५ / २५७ प्रमाणे आदेश आवश्यक तेथे आदेश प्राप्त करून घेऊनच दुरुस्त्या कराव्यात . आपल्या फेरफारामध्ये नमूद १५५ / २५७ च्या आदेश्याचा उल्लेख आहे त्याची नक्कल आपल्याला देता आली पाहिजे हे लक्षात ठेवा . त्यासठी या प्रकल्प मध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाची म्हणजेच तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , महसूल पालक अधिकारी , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , डी डी , जिल्हाधिकारी यांची जबाबदारी आहे ह्याची जाणीव नेहमी मनात ठेवावी.डिजिटल स्वाक्षरीत /१२ च्या कामात १०० % गुणवत्ता राखणे आपले सर्वांचे काम जबाबदारी आहे

DSP साठी 7/12 कोणत्या २० अहवालातून पास होणे आवश्यक ?

DSP-RoR मध्ये /१२ कोणत्या वीस अहवालामधून पास होणा आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे हे आपल्या माहितीसाठी येथे नमूद करत आहे .अहवाल निरंक करण्यासाठीच्या सुविधा कंसात नमूद केल्या आहेत .
odc मधील अहवाल क्र. - : - गाव नमुना वरील एकुण क्षेत्र /१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक. (eFerfar-take a mutation)

 odc मधील अहवाल क्र. - : -गाव नमुना मधील क्षेत्रांचा फ़रक. VF I change in ODC, VF VII chages in eFerfar

 odc मधील अहवाल क्र. - : -गाव नमुना वरील एकुण क्षेत्र जिरायतबागायतइत्यादी क्षेत्र यांचा मेळ बसलेले सर्व्हे क्र. ODC Option for Ahwal-4 durusti

odc मधील अहवाल क्र. - : - /१२ खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक use ODC- वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे(अहवाल-)

odc मधील अहवाल क्र. - : - खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार use ODC-खाता प्रकार दुरुस्ती (अहवाल-)

odc मधील अहवाल क्र. - : - फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे (ODC)

odc मधील अहवाल क्र. - ११ : - इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही (eFerfar-take a mutation) odc मधील

odc मधील अहवाल क्र. - १२ : - फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी (eFerfar-take a 155 mutation)

odc मधील अहवाल क्र. - १३ : - भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही (eFerfar-take a Order mutation)

odc मधील अहवाल क्र. - १५ : -निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाते. use ODC- निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाता क्रमांक दुरुस्ती
odc मधील अहवाल क्र. - १८ : -सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी. (eFerfar-take a mutation)

odc मधील अहवाल क्र. - १९ : -सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी. (eFerfar-take a mutation)

odc मधील अहवाल क्र. - २१ : -/१२ वरील एकूण क्षेत्र क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र. (eFerfar-take a mutation)

odc मधील अहवाल क्र. - २२ : - शून्य क्षेत्र असलेले /१२ वरील चालू खाता क्रमांक. (eFerfar-take a mutation)

odc मधील अहवाल क्र. - २४ : -एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांकाची यादी. (eFerfar-take a order mutation and change Survey number)

odc मधील अहवाल क्र. - २५ : -भूधारणा : भोगवटदार - असलेले परंतु मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक. ( Option Provided in UC)

odc मधील अहवाल क्र. - २६ : -भूधारणा : भोगवटदार - असलेले परंतु मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांकाची यादी. (use eferfar- Option is Provided and Approve by CO)

odc मधील अहवाल क्र. - २७ : -खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक. Use ODC-खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाते क्रमांक / नावे काढून टाकणे. अतिरिक्त odc मधील अहवाल क्र. - : - खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट. Use ODC खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट काढून टाकणे.
अतिरिक्त odc मधील अहवाल क्र. - १२ : -
अहवाल 5- अतिरिक्त.
Use ODC - अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती

पर्याय क्र. OR अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती

पर्याय क्र.-खाता विभागणी वरील प्रमाणे सुविधा वापरून अहवाल निरंक केल्या नंतरच सर्व /१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येतील . कोणताही /१२ चुकीचा असून देखीन डिजिटल स्वाक्षरीत होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी
DSP करण्यापूर्वी अतिरिक्त अहवाल च्या दुरुस्ती बाबत

 प्रत्यक्ष कार्यवाही करताना ODC मधील अहवाल निरंक रणे आवश्यक आहे . सर्व प्रथम ODC मध्ये तलाठी यांनी लोगिन करुन अहवाल- अहवाल-११ पाहावा हे अहवाल यासाठी दिलेल्या दुरुस्ती सुविधामधुन निरंक करावेत. त्यानंतर अतिरिक्त अहवाल दुरुस्त करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. DATABASE मध्ये खाता मास्टर /१२ वरील नावांच्या संख्यें मध्ये फरक असल्यास तलाठी यांच्या ODC लोगीनमध्ये अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल- ) दिसतो. 1. अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल-) मध्ये खाते नंबर, खात्यातील खातेदारांची संख्या सदर खात्यातील एकुण सर्व्हे नंबर वेगवेगळया खातेदार संख्येच्या फरकाने दिसतील याचाच अर्थ खाते जरी एकच असले तरी त्या खात्यातील काही सर्व्हे नंबरवर खात्यादारांची संख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे जर आपणास वेगवेगळया सर्व्हे क्रमांकावर वेगवेगळया संख्येने असलेली नावे सर्व सर्व्हे क्रमांकावर समान करावयाची असल्यास दुरुस्ती सुविधामध्ये अतिरिक्त अहवाल- ची दुरुस्ती करायला हरकत नाही. परंतु जर आपणास वेगवेगळी नावे /१२ वर वेगवेगळया संख्येने हवी असल्यास खाता विभागणी ODC मधून करावी.   . दुरुस्ती सुविधामधिल दुरुस्ती सुविधा -२१ अतिरिक्त अहवाल- ची दुरुस्ती करुन घेण्यासाठी सदर खात्यातील सर्व /१२ पाहावेत खात्री करावी की सदर खाता मास्टरमधिल नावे सर्व /१२ वर असणे आवश्यक आहे का ?. त्यानंतर खात्यातील कोणत्याही एका सर्व्हे नंबरला निवडा (टिक) करावे. निवडा केलेल्या सर्व्हे नंबरच्या खाता मास्टरमधिल सर्व नावे दिसतील. आपणास खाता मास्टरमधिल सर्व नावे सर्व सर्व्हे नंबरसाठी समाविष्ट करण्यासाठीखात्यामध्ये समाविष्ट कराया बटनावर क्लिक करावे. सर्व नावे सर्व सर्व्हे नंबरसाठी समाविष्ट करण्यासाठी खात्यामध्ये समाविष्ट करुन घेतल्यानंतर सदर नावांपैकी एखादे नाव नको असल्यास ते नाव निवडून (टिकमार्क करून) माहिती साठवा करावी. मात्र कोणतेही नाव /१२ वरून काढून टाकावयाचे नसल्यास नाव निवडण्याची गरज नाही. वरिल संपुर्ण कार्यवाही झाल्यानंतर प्रत्येक /१२ ८अ पाहावा सदर /१२ वरिल क्षेत्र नावासमोरील फेरफार क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. याप्रमाणे अतिरिक्त अहवाल-१२ (अतिरिक्त अहवाल- ) निरंक झाल्यांतरच DSP वापरून /१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येईल.
ODC मधील अतिरिक्त अहवाल ची अहवाल च्या दुरुस्ती साठी नवीन सुविधा  उपलब्ध करून देनेत येत आहे . ) ODC मधील अतिरिक्त अहवाल ची दुरुस्ती साठी तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ) पर्याय खात्यात नवे समाविष्ट करून वगळून दुरुस्ती - दुरुस्ती सुविधा क्र २१ ) पर्याय खाता विभागणी करून दुरुस्ती - दुरुस्ती सुविधा क्र २२ ) पर्याय खाता क्रमांक बदलून दुरुस्ती - दुरुस्ती सुविधा क्र २३ असे तीन पर्याय असून ) पर्याय - खात्यात नवे समाविष्ट करून वगळून दुरुस्ती ( दुरुस्ती सुविधा क्र २१) -- हा पर्याय जर एकाच नाव वेगवेगळ्या सर्वे नं वर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली असेल तर अशी वेगवेगळ्या सर्वे नं वरील नावे प्रथम समाविष्ट करून जे नाव योग्य पद्धतीने लिहिले असेल ते ठेऊन अयोग्य पद्धतीने लिहिलेले नाव निवडून वगळण्यात यावे . ) पर्याय खाता विभागणी करून दुरुस्ती ( दुरुस्ती सुविधा क्र २२)-- हा पर्याय जर काही सर्वे नं वरील अतिरिक्त नावाचे वेगळे खाते करायचे असल्यास वापरावा ( या पर्यायाचा वापर जास्त होणार नाही ) ) पर्याय खाता क्रमांक बदलून दुरुस्ती ( दुरुस्ती सुविधा क्र २३) -- हा पर्याय जर एकाच खात्यातील काही सर्वे नं वरील नावे नावांची संख्या वेगवेगळी असताना खाते तयार झाले असल्यास ( किंवा घोषणापत्र पूर्वी खाता विभागणी करायचे राहिले असल्यास ) आत्ता आपणास ती नावे नावांची संख्या तीच कायम ठेवायची असल्यास खाता विभागणी करून खाते क्रमांक बदलण्यासाठी वापरावा . याचे युजर म्यानुअल सोबत जोडले आहे ) ODC मधील शून्य फेरफार क्रमांकाची दुरुस्ती (अहवाल ची दुरुस्ती ) दुरुस्ती सुविधा क्र.२४ उपलब्ध करून दिली आहे , या मध्ये फक्त फेरफार क्रमांक शून्य असलेल्या खातेदाराच्या नावासमोरील फेरफार क्रमांक बदलता येईल . तो फेरफार क्रमांक योग्य असल्याची खात्री तलाठी यांनी स्वता करावी कारण या फेरफार क्रमांकाची नक्कल आपल्याला देता आली पाहिजे . याचे युजर म्यानुअल सोबत जोडले आहे या नव्याने दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करून ODC अहवाल अतिरिक्त अहवाल दुरुस्त करूनच सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करावेत



डिजिटली signed 7/12 व 8 अ

डिजिटल स्वाक्षरिकृत  गाव नमुना 8 खाते उतारा जनतेसाठी उपलब्ध राज्यात सुरु असलेल्या ई-पेपर प्रकल्पामध्ये गाव नमुना सातबारा गाव नमुना 6 म्हणजे ...